प्रयागराजमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित

प्रयागराजमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात बुधवार, २१ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. प्रयागराजच्या मध्यभागी असलेल्या केपी कॉलेजच्या मागे एका तलावात अचानक हे विमान कोसळून अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात भीती निर्माण झाली होती. स्थानिकांनी तात्काळ पोलिस आणि प्रशासनाला माहिती दिली. हे विमान प्रशिक्षणार्थी विमान असल्याचे समोर आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. प्रशासन संपूर्ण परिसराला वेढा घालून सुरक्षित करत आहे. विमान अपघाताच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे.

अपघातग्रस्त विमान हवाई दलाचे मायक्रोलाईट विमान होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान तलावात कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. तलावात कोसळण्यापूर्वी विमान बराच वेळ हवेत घिरट्या घालत होते. विमानात दोन क्रू मेंबर्स होते. लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोघेही सुरक्षित आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

कल्याण- डोंबिवलीत मनसेची एकनाथ शिंदेंना साथ! भाजपाचे काय होणार?

कर्तव्य मार्गावर रचणार इतिहास; काश्मिरी मुलगी करणार सीआरपीएफ पुरुष संघाचे नेतृत्व!

पाक संरक्षण मंत्र्यांकडून बनावट ‘पिझ्झा हट’चे उद्घाटन; खऱ्या कंपनीने पाठवली नोटीस

सनातन धर्मावर द्वेषपूर्ण टिप्पणी करणाऱ्या उदयनिधीचे कान उपटले!

प्रशिक्षणार्थी विमानाने प्रयागराजमधील बामरौली विमानतळावरून उड्डाण केले होते. त्याची कमाल आसन क्षमता दोन लोकांची आहे. प्रयागराज विमानतळ हे केंद्रीय हवाई कमांडचे मुख्यालय आहे. अपघातस्थळापासून विमानतळ फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. तांत्रिक बिघाडामुळे तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. हवाई दलाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Exit mobile version