घरविशेषमोदी, नेतन्याहू, ट्रम्प म्हणाले, स्मित तूच खरा हिरो!

मोदी, नेतन्याहू, ट्रम्प म्हणाले, स्मित तूच खरा हिरो!

भारतीय वैमानिकाची धाडसी कामगिरी चर्चेत

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हवेत असताना झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय कॅप्टन स्मित माछर यांचे धैर्य चर्चेत आले आहे. सहवैमानिकाने चाकूने हल्ला केल्यानंतर गंभीर जखमी होऊनही माछर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी मार्ग उपलब्ध करून दिला. त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी हल्लेखोराला आवरले, पुढे विमानाचे सुखरूप लँडिंगही झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तसेच तुम्ही खरे हिरो असल्याचे म्हणत त्यांच्या शौर्याला सलाम केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित माछर यांना ‘हिरो’ संबोधत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कॅप्टन स्मित माछर हे एक नायक आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी असूनही, त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी असीम धैर्य आणि अटळ निश्चय दाखवला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन माछर यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नव्याने बळ मिळावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे.”

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही माछर यांच्या धैर्याला सलाम केला. ते म्हणाले की, “भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांच्या असीम धैर्याला सलाम. चाकूहल्ला होऊन गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी जिद्दीने लढा दिला, प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला; ज्यामुळे प्रवासी व कर्मचारी त्या हल्लेखोराला नियंत्रणात आणू शकले आणि हवेत घडणारी एक मोठी दुर्घटना टळली. त्यांनी इस्रायली नागरिकांसह इतर देशांच्या नागरिकांचेही, अशा एकूण १७४ लोकांचे प्राण वाचवले. कॅप्टन माछर हे लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरे व्हावेत, अशी मी कामना करतो. ते एक खरे नायक आहेत.”

या घटनेनंतर इस्रायलमध्ये सोशल मीडियावरही स्मित माछर यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे. अनेक इस्रायली नागरिकांनी व्हिडीओ आणि पोस्टद्वारे भारतीय कॅप्टनचे आभार मानले. काहींनी त्यांचे नाव लक्षात ठेवण्याचे आवाहन करत त्यांच्या धैर्याला सलाम केला.

हे ही वाचा:

फ्लायदुबईच्या विमानातील १८० जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छर कोण?

इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला

लवलीनाचा ठोसा, सुवर्णाची आशा

राजेश-चिकिथाचा सुवर्णवेध, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के!

व्हाइट हाऊसमध्ये फ्लायदुबईच्या विमानाबाबत विचारण्यात आले असता ट्रम्प म्हणाले, “मला वाटते, ही एक अविश्वसनीय घटना आहे. मात्र, या घटनेबाबत मी नेतन्याहू यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.” ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सांगण्यात आले की, “को-पायलट कदाचित दहशतवादी होता किंवा कदाचित सनकी होता आणि त्याने पायलटवर चाकूने हल्ला केला.” ते म्हणाले, “पायलटची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि माझ्या मते, अजूनही गंभीर आहे. मात्र, गंभीर अवस्थेतही त्याने कशीतरी दरवाजा उघडण्याची सूझबूझ दाखवली. हे आश्चर्यकारक होते. तो एक हिरो आहे.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version