सरदार वल्लभभाई पटेलांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘न्यूज डंका’ने काढलेल्या ‘लोहपुरुष’ या दसरा-दिवाळी अंकाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाईंचे पोलादी व्यक्तिमत्त्व समोर आणण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी देशाच्या एकतेसाठी दिलेल्या अद्वितिय योगदानाच्या इतिहासाचा पट उलगडण्याचे काम या अंकातून करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा असे या अंकाचे स्वरूप आहे, अशा शब्दांत वनमंत्री गणेश नाईक यांनी या अंकाचे कौतुक केले.
ऐरोलीतील नगरसेविका श्रेया सुदर्शन जिरगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ‘न्यूज डंका’च्या ‘लोहपुरुष’ या दसरा दिवाळी अंकाच्या प्रती सर्व उपस्थित नेत्यांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, स्थायी समिती अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.
हे ही वाचा:
मारुती सुझुकीची विक्री ऐतिहासिक उच्चांकावर
कॉक्रोच जनता पार्टीचा इंडी आघाडीच्या रॅलीत सहभाग नाही
सरदार वल्लभभाई पटेलांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या अंकात अनेक नामवंतांनी, इतिहास तज्ज्ञांनी वल्लभभाईंच्या जीवनातील विविध पैलू मांडले आहेत. हा अंक आता सर्वत्र उपलब्ध असून 9967772000 या क्रमांकावर संपर्क करून त्याची नोंदणी करता येऊ शकते. वंदे मातरम या गीताची १५० वर्षे तसेच श्री गुरू तेगबहादूरजी यांच्या ३५०व्या बलिदान वर्षाच्या निमित्ताने ‘वंदे मातरम’, ‘हिंद दी चादर’ हे दसरा दिवाळी अंकही प्रकाशित झालेले आहेत.
