घरविशेषदुष्काळग्रस्त ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा

दुष्काळग्रस्त ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा

उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांत पुढील दोन दिवसांत मदत जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य सरकारने ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीक नुकसानीची अंतिम भरपाई मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे. ही मदत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जात आहे.
हे ही वाचा:
‘नाविक’मुळे इस्रोचा NVS-03 उपग्रह यशस्वीरीत्या कक्षेत स्थानापन्न

भारतासह चार देशांना इराणची मुभा

भूतानमध्ये १०८ बौद्ध स्तूपांची उभारणी; ७६वा स्तूप मोदींच्या नावे समर्पित

अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ४ हजार ७६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास २१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, त्यासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत कितपत पुरेशी ठरणार, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अग्रिम मदतीसोबतच प्रत्यक्ष पीक नुकसानीनुसार मिळणारी अंतिम नुकसानभरपाई आणि कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version