घरविशेषपुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

शनिवारी महाराष्ट्राचा कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा चिंताजनक आहे. शनिवारी महाराष्ट्रात ३५,७२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १८६ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर राजधानाची मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चनल पाहायला मिळाला. शनिवारी मुंबईत ६१३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहते. महाराष्ट्र सध्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकाला आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले नऊ जिल्हे आहेत.

महाराष्ट्राची ही परिस्थिती लक्षात घेता २८ मार्च पासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या जमावबंदीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत कुठल्या गोष्टींना कुठल्या वेळेत परवानगी आहे आणि कशावर बंदी आहे हे जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी

पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी

बांग्लादेशच्या स्वातंत्र्याची पहिली मागणी जनसंघाचीच

काय आहेत निर्बंध?
महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदीच्या नियमावलीनुसार खालील प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ५ पेक्षा जास्ती लोकांना एकत्रित फिरण्यास बंदी असणार आहे. या गोष्टीचे उल्लंघन केल्यावर माणशी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासोबतच रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत उद्याने, समुद्र किनारे, रेस्टोरंट्स, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स अशी सगळी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टोरंट्सना रात्री ८ नंतर डिलिव्हरीची सेवा देण्यास परवानगी आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे तर उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभांना ५० माणसांना हजार राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version