घरविशेषसंतापजनक! "महिला जमिनीवर बाळंत झाली, नर्स म्हणाली – 'मजा आली का?'"

संतापजनक! “महिला जमिनीवर बाळंत झाली, नर्स म्हणाली – ‘मजा आली का?'”

उत्तराखंडच्या हरिद्वारमधील घटना 

हरिद्वार येथील सरकारी रुग्णालयात मंगळवारी रात्री एक धक्कादायक आणि अमानवी घटना घडली. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीस नकार दिल्यामुळे एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या जमिनीवरच प्रसूती करावी लागली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या प्रसूतीनंतर एका परिचारिकेने उपहासात्मक टिप्पणी केली – “मजा आया? और बाचा पैदा करेगी?”

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (३० सप्टेंबर) रात्री ९:३० वाजता ही महिला रुग्णालयात दाखल झाली. मात्र, ड्युटीवरील डॉक्टरांनी हे म्हणत उपचार नाकारले की, येथे प्रसूती होऊ शकत नाही. यानंतर महिला वेदनेने तडफडत रुग्णालयाच्या आवारातच पडून राहिली. पहाटे १:३० वाजता तिची रुग्णालयाच्या जमिनीवरच प्रसूती झाली, आणि त्यादरम्यान कोणतीही वैद्यकीय मदत दिली गेली नाही.

कुटुंबीयांचा आक्रोश

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसूतीनंतर आलेल्या कुटुंबातील सोनी नावाच्या महिलेनं माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “आम्ही पोहोचलो तेव्हा तिने (गर्भवती महिलेने) सांगितलं की कोणीच तिला बेडवर झोपू दिलं नाही. तिच्या आजूबाजूला कोणी डॉक्टर, नर्स नव्हते. अशा अवस्थेत कोणी एका महिलेला जमिनीवर कसे सोडून देतं?”

तिने आणखी सांगितले, “बाळाला काही झालं असतं, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? लोक रुग्णालयात आनंदासाठी नाही, तर गरजेसाठी येतात. अशी वागणूक देणं अमानुष आहे.”

या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ही महिला जमिनीवर तडफडताना आणि तिच्या मागे एक वृद्ध महिला तिला आधार देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रुग्णालयातील कुठलाही कर्मचारी दिसून आलेला नाही.

हे ही वाचा :

पीओकेमध्ये हिंसक आंदोलन; पाक सैन्याच्या गोळीबारात १२ ठार!

गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर

इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग योजनेला प्रचंड प्रतिसाद

‘आय लव्ह मोहम्मद’: बरेलीमध्ये हॉल सील केल्याने ६०० लग्नांचे नियोजन कोलमडले!

प्रशासनाकडून कारवाईची घोषणा

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. सिंह यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “प्राथमिक अहवाल घेतला आहे, सविस्तर तपशील अजून प्रतीक्षेत आहे. व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहोत. जर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले, तर कठोर कारवाई केली जाईल.”

या प्रकरणात ड्युटीवर असलेल्या कंत्राटी डॉक्टर डॉ. सोनाली यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, दोन परिचारिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत असलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश न देण्यामागचे कारण आणि दोषींची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version