घरविशेषआमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते होणार ‘जन समाधान कार्यालया’चे उद्घाटन

आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते होणार ‘जन समाधान कार्यालया’चे उद्घाटन

वॉर्ड क्रमांक ४५ मालाड (पूर्व) येथे असणार नगरसेवक संजय कांबळे यांचे कार्यालय

- Advertisement -

मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४५ मधील नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने, प्रभावीपणे सोडवल्या जाणार असून विकासकामांना गती दिली जाणार आहे. यासाठी मालाड (पूर्व) येथे ‘जन समाधान कार्यालय’ सुरू करण्यात येत आहे. या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. नगरसेवक आणि ‘स्थापत्य समिती उपनगरे’चे सदस्य संजय कांबळे यांचे हे कार्यालय असणार आहे.

नगरसेवक संजय कांबळे यांच्या ‘जन समाधान कार्यालया’चे उद्घाटन कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यालय क्र. १, गुरुकृपा इमारत, पंडित सॉलिसिटर रोड, मालाड (पूर्व), मुंबई येथे हा उद्घाटन सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

“वॉर्ड ४५ मधील जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे करता यावी, त्यांच्या समस्या त्वरित सोडवता याव्यात आणि विकासकामांना अधिक गती देता यावी, या उद्देशाने जन समाधान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत आहे,” अशा भावना नगरसेवक संजय कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

मुस्लिम युवकांनी बरेलीत महात्मा गांधींना टोपी घातली, खांद्यावर हात ठेवून फोटो काढले!

भारताच्या AI क्षेत्रात मोठी झेप

वंदे मातरमविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

इंधन टंचाईच्या अफवा निराधार; देशात पुरेसा साठा

‘जन समाधान कार्यालया’मुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक विश्वासार्ह ठिकाण मिळणार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित तक्रारींचे निवारण व्हावे, यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय या कार्यालयामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version