घरविशेषकर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या

कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या

वैयक्तिक शत्रुत्वातून ही हत्या झाल्याचा अंदाज

कर्नाटकच्या उडुपी येथील निजार गावातील एका घरात एकाच कुटुंबातील महिलेसह तिच्या दोन मुलांची भोसकून हत्या केल्याचे रविवारी उघड्कीस आले आहे. कोणीतरी अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
हल्लेखोरांनी पहिल्यांदा महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. त्यानंतर तिचा सर्वांत लहान, १२ वर्षांच्या मुलाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या किंकाळण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारच्यांना काही विपरित घडत असल्याचा अंदाज झाला. त्यांनी त्वरित या घरात धाव घेतली. मात्र या हल्लेखोरांनी त्यांना धमकावले.

 

हल्ल्यादरम्यान या महिलेच्या सासूलाही भोसकण्यात आले आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेचे नाव हसीना असून तिच्या तिन्ही मुलांनाही चाकू भोसकून ठार मारण्यात आले आहे, अशी माहिती उडुपीच्या पोलिस अधीक्षकांनी दिली. वैयक्तिक शत्रुत्वातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असला तरी पोलिस तपासानंतरच सत्य काय ते उघड होणार आहे. घरातून कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झालेली नाही. त्यामुळे या हत्येमागे चोरीचा हेतू पोलिसांनी फेटाळला आहे.

हे ही वाचा:

दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!

भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र

‘आम्हाला या घटनेबाबत सकाळी १० वाजता माहिती मिळाली. शेजाऱ्यांनी त्यांच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून आम्हाला लगेचच याबाबत कळवले होते. आता आम्ही या घटनेचा सखोल तपास करणार असून ही महिला किंवा मुलांचे हल्लेखोराशी काही वैयक्तिक शत्रुत्व होते का, याचा आम्ही तपास करणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version