घरविशेषपोक्सो अंतर्गत तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश

पोक्सो अंतर्गत तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश

पोलिस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांनी मंगळवारी अखेर बाल लैंगिक अत्याचार कायदा (पोस्को) किंवा विनयभंगाच्या बाबतीत येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी आदेश जारी करत तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पैशाची देवाण- घेवाण, जुने भांडण, मालमत्ता वाद आणि वैयक्तिक कारणातून बऱ्याचदा विनयभंग किंवा पोस्को कायद्यांतर्गत तक्रार करण्यात येते. पोक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा करण्यापूर्वी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात यावी, असा आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दिला होता. या आदेशावरून काहीसा वाद निर्माण होऊन उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले होते.

हे ही वाचा:

मुंद्रा बंदरावर ३७६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हा आदेश मागे घेत पोक्सो सारखा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून पोक्सो अंतर्गत तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version