घरविशेषपंतप्रधान मोदींकडून मेलोनींना ‘शिरुई लिली सिल्क स्टोल’ची भेट

पंतप्रधान मोदींकडून मेलोनींना ‘शिरुई लिली सिल्क स्टोल’ची भेट

विशेष भेटवस्तू देऊन दाखवली भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक

पाच देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी भारतात परतले. संयुक्त अरब अमिराती, इटली, नेदरलँड्स, स्वीडन आणि नॉर्वे या देशांच्या दौऱ्यात त्यांनी अनेक रणनीतिक आणि द्विपक्षीय विषयांवर चर्चा केली. याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना विशेष भेटवस्तू देत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दाखवली.

पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना मूगा सिल्क स्टोल आणि शिरुई लिली सिल्क स्टोल भेट म्हणून दिल्या. ‘गोल्डन सिल्क’ म्हणून ओळखले जाणारे मूगा सिल्क हे आसाममधील ब्रह्मपुत्रा खोऱ्यात तयार होणारे दुर्मिळ आणि प्रतिष्ठित वस्त्र आहे. नैसर्गिक सोनेरी रंग, आकर्षक पोत आणि टिकाऊपणासाठी ते प्रसिद्ध आहे. कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय तयार होणाऱ्या या रेशीम वस्त्राची चमक काळानुसार अधिक खुलत जाते. तसेच आर्द्रता शोषून घेणे आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देण्याचे गुणधर्मही त्यात आहेत.

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना मणिपूरमधील शिरुई काशोंग पर्वतरांगांपासून प्रेरित शिरुई लिली सिल्क स्टोलही भेट दिला. शिरुई लिली हे घंटेसारख्या आकाराचे गुलाबी-पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ फूल असून ते जगात फक्त मणिपूरमध्येच आढळते. तांगखुल नागा समाजासाठी हे फूल पवित्रता, ओळख आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हा स्टोल केवळ हिमालयीन हस्तकलेचे सौंदर्य दर्शवत नाही, तर स्थानिक परंपरा आणि लोककथांचाही वारसा जपतो.

विशेष म्हणजे, इटलीमध्येही लिली फुलाला मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. तेथे हे फूल पवित्रता, सौंदर्य आणि कलात्मक परिष्करणाचे प्रतीक मानले जाते आणि पुनर्जागरणकालीन कलाकृतींमध्येही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतो. या समान सांस्कृतिक प्रतीकांमुळे भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होत असल्याचे मानले जाते.

हे ही वाचा

महेश्वरी सिल्क ते मेघालयातील अननस; पंतप्रधान मोदींकडून युएई नेतृत्वाला खास भेट

रहमान गल्ली आता राम गल्ली; लाहोरमधील रस्त्यांची नावे का बदलली जात आहेत?

शाळांनंतर पश्चिम बंगालमधील मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ म्हणणे अनिवार्य

अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण!

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मत्तारेला यांना आग्र्याच्या प्रसिद्ध पच्चीकारी कलेतून तयार केलेला संगमरवरी जडाव कामाचा बॉक्स तसेच पंडित भीमसेन जोशी आणि एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या संगीताच्या सीडी भेट दिल्या. हा संगमरवरी जडाव बॉक्स भारताच्या उत्कृष्ट हस्तकलेचे प्रतीक मानला जातो. ‘पच्चीकारी’ किंवा ‘पिएत्रा ड्यूरा’ ही कला मूळची इटलीतील फ्लॉरेन्स शहरातील असून नंतर भारतात मुघलकालीन राजाश्रयामुळे ती मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. त्यामुळे ही कला भारत आणि इटली यांच्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक सेतू मानली जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version