घरविशेषगणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज

प्रशासनाकडून विशेष नियोजन

- Advertisement -

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली असून सुरक्षेसाठी शहरात २६ हजारांहून अधिक पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यंदा सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विसर्जनानंतर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रभर लोकल आणि मेट्रो सेवा सुरू ठेवण्याबाबत मुंबई पोलिसांनी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाला पत्र दिले आहे. सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोज कुमार शर्मा आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण चौधरी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खाकीचा कडक बंदोबस्त

सुरक्षेसाठी सहा सहपोलीस आयुक्त, ३८ उपायुक्त, ५८ सहायक आयुक्त, ३,२१३ पोलीस निरीक्षक आणि १८,९४० अंमलदार असे एकूण २६ हजार २२ पोलिस रस्त्यावर उतरतील. याशिवाय होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्याही मदतीला असतील.

चौपाटीवर ५१ वॉच टॉवर, ‘एआय’ची नजर

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. गिरगाव चौपाटीवर ५१ वॉच टॉवर उभारण्यात आले असून, तेथून संपूर्ण परिसरावर बारीक लक्ष ठेवले जाईल. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त बोटी, तराफे आणि मोठ्या मूर्तींसाठी क्रेन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईत ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियोजन आणि पार्किंग

  • लालबाग-परळ परिसरातील गर्दी लक्षात घेऊन बीपीटी मैदानात विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मिरवणूक मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास कोंडी होऊ नये म्हणून जागोजागी हायड्रॉलिक क्रेन तैनात राहतील.
  • जुहू तारा रोडसह प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिसांचा विशेष पहारा असेल.
  • गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाईल.

हे ही वाचा:

‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

सीसीटीव्ही गायब, अहवालात क्लीनचिट; २०२३ बंगाल पंचायत निवडणुकीत गैरप्रकार

थारच्या चेसिसपासून कंबरेच्या पट्ट्यापर्यंत; ३२ कोटींचे सोने जप्त

पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर ड्रोन हल्ले

लोकल-मेट्रो २४ तास चालवण्याची विनंती

भाविकांना मध्यरात्री घरी परतणे सोयीचे व्हावे म्हणून लोकल आणि मेट्रो २४ तास चालवण्याची विनंती पोलिसांनी प्रशासनाकडे केली आहे. मध्य रेल्वेने रात्री विशेष फेऱ्यांचे नियोजन केले असून, गिरगाव चौपाटीवरील गर्दीचा ताण पाहता चर्नी रोड स्थानकावरील लोकलच्या थांब्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version