घरविशेषराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. राजनाथ सिंह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. शनिवारीच राष्ट्रपती कोविंद यांना ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) दिल्ली येथे दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं ठरलं होतं.

मी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन करतो. ‘एम्सच्या संचालकांशी संवाद साधून मी राष्ट्रपतींच्या आरोग्याची चौकशी केली. आता त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’ असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं.

शुक्रवारी छातीत दुखल्यामुळं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आर्मी रुग्णालयात गेले होते. ज्यानंतर ठरल्याप्रमाणं त्यांनी बायपास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता.

शुक्रवारी छातीत दुखल्यामुळं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आर्मी रुग्णालयात गेले होते. ज्यानंतर ठरल्याप्रमाणं बायपास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता.

हे ही वाचा:

संजय राऊत यांची चौकशी करा

पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना २७ मार्च २०२१ रोजी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपासाअंती डॉक्टरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे आहे. ही शस्त्रक्रिया ३० मार्च रोजी होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत राष्ट्रपती कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर असून तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत.” असे पत्रक राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version