घरविशेषपुणे: यवतमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, २१ लोक ताब्यात, सध्या परिस्थिती सामान्य!

पुणे: यवतमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, २१ लोक ताब्यात, सध्या परिस्थिती सामान्य!

पुण्याचे एएसपी गणेश बिरादार यांची माहिती 

पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात काल (१ ऑगस्ट) दोन गट आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानतर गावात दोन्ही बाजूंनी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ झाली होती. दरम्यान, सध्या गावात शांतात आहे, शाळा-रुग्णालये सुरु झाली आहेत. पुण्याचे एएसपी गणेश बिरादार यांनी ही माहिती दिली. तसेच कालच्या प्रकारानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून २१ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “काल यवतमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती, काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि काही प्रार्थनास्थळांचीही तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी १५० हून अधिक नावे नोंदवली आहेत आणि त्यांच्याविरुद्ध पुरावे म्हणून आम्हाला काही व्हिडिओ फुटेज आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.

हे ही वाचा : 

नवाभारत पहलगामच्या गुन्हेगारांना ‘मातीमध्ये मिसळण्याची’ ताकद ठेवतो

गंगेत ३१ लोकांनी भरलेली बोट उलटली

लंपीने १० राज्यांतील गोवंश संक्रमित

काँग्रेसचं तोंड काळं, भगवा आणि सनातनाचा विजय

आम्ही आतापर्यंत एकूण २०-२१ लोकांना ताब्यात घेतले आहे. आमच्याकडे १६-१७ लोकांचे फुटेज आहेत, त्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी आम्ही त्यांना अटक करत आहोत. शहर आणि गावातील वातावरण आता सामान्य होत आहे. शाळा सुरू आहेत आणि वैद्यकीय सुविधा सुरू आहेत. प्रशासनाने जमावबंदी आणि कर्फ्यूचे आदेश जारी केले आहेत आणि त्याची अंमलबजावणी अजूनही या शहरात सुरू आहे. शहरात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे. कालपासून कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही, असे एएसपी गणेश बिरादार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version