घरविशेषघाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत मुंबई पोलीस, पालिका , एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दलाचे बचाव कार्य

घाटकोपर होर्डींग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी देते भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे.

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांनी जाहिरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. अनिल गलगली यांच्या मते ४ महाकाय होर्डींग आणि एक पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली पण त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेतली गेली नाही उलट पालिकेने मागील वर्षी या होर्डींग प्रकरणात कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठविले.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!

गुवाहाटीत सापडले अल कायदाशी संबंधित दोन बांगलादेशी अतिरेकी!

वाराणसीच्या उत्स्फूर्त जल्लोषात मोदींनी भरला उमेदवारी अर्ज

पीएफआयकडून हिंदूंना मारण्यासाठी ‘डेथ स्क्वॉड’ची उभारणी!

मुंबईत ४० बाय ४० ची होर्डींग परवानगी पालिका देते पण येथे आकार १२० बाय १२० चा होता. ७ डिसेंबर २०२१ रोजी लोहमार्ग पोलिसांनी एगो मीडिया कंपनीस कंत्राट दिले होते. याप्रकरणी चौकशी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे. मुंबईत रेल्वे, एमएमआरडीए, बीपीटी, म्हाडा, एमएसआरडीसी यांनी होर्डींग लावताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून सद्यस्थितीत सर्व होर्डींगचे सुरक्षा ऑडिट केले जावे, असे गलगली यांचे मत आहे. घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत मुंबई पोलीस, पालिका , एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दल जोमाने बचाव कार्य करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version