घरविशेषरोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांना २५००० रुपयांना दिल्लीत पाठवत असत, १५ जणांना अटक!

रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांना २५००० रुपयांना दिल्लीत पाठवत असत, १५ जणांना अटक!

बीएसएफची कारवाई, १८७ मोबाईलही जप्त

सीमा सुरक्षा दलाने (BSF) मेघालय आणि त्रिपुरा सीमेवर केलेल्या कारवाईदरम्यान ११ घुसखोर आणि ४ भारतीय साथीदारांना अटक केली आहे. यापैकी ७ बांगलादेशी घुसखोर आहेत आणि ४ रोहिंग्या आहेत. त्यांना रविवारी (१६ मार्च ) या राज्यांच्या सीमावर्ती ग्रामीण भागातून पकडण्यात आले. या प्रकरणी सुरक्षा दलाकडून पुढील तपास आणि कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान बीएसएफने १८७ सेकंड हँड मोबाईल फोनही जप्त केले आहेत. त्रिपुराच्या सेपाहिजला जिल्ह्यातून हे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. घुसखोरांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. मेघालयात पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता आणि तिच्यासोबत दोन भारतीय सहाय्यकांनाही पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

विज्ञान, तंत्रज्ञानाने अंतराळातील अनेक अडचणींवर मात केली

वांद्रेमधील गोडाऊनमधून २८६ किलो गांजा जप्त; इम्रान अन्सारीला अटक

श्रीकृष्ण जन्मभूमी-ईदगाह प्रकरणी आज सुनावणी

पुण्यातील हिंजवडीमध्ये टेंपो ट्रॅव्हलरला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू

याशिवाय, त्रिपुरातील धर्मनगरमध्ये २ महिलांसह ४ रोहिंग्यांना पकडण्यात आले. रोहिंग्यांची ओळख जाहिद आलम, मंतजुल हक, मीन तारा आणि पुटू अख्तर अशी झाली आहे. याशिवाय मुनीम आणि इक्बाल नावाच्या दोन भारतीय सहाय्यकांनाही अटक करण्यात आली आहे.

जाहिद म्हणाला की तो दिल्लीला जात होता आणि काटेरी तारांच्या कुंपणाला टाळून त्रिपुराच्या उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर मार्गे जाण्याची त्याची योजना होती. यासाठी भारतीय तस्करांना २५ हजार रुपये देण्यात आल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांविरोधात बीएसएफकडून पुढील कारवाई सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version