घरविशेषकापड व्यावसायिकाने दिली कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाखाची दिवाळी

कापड व्यावसायिकाने दिली कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाखाची दिवाळी

२० कर्मचाऱ्यांना वाटला बोनस

गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांहून अधिक रकमेचा रोख बोनस दिला. नव्या कोऱ्या नोटांच्या बंडलमध्ये मिळालेली ही भेट पाहून अनेक कर्मचारी आश्चर्यचकित झाले. तर एका महिला कर्मचाऱ्याला पैसे स्वीकारताना अश्रू अनावर झाले.

सुरतमध्ये कापड व्यवसाय करणारे रामस्वरूप मुंडे यांनी आपल्या २० कर्मचाऱ्यांना हा बोनस वाटला. दिवाळीनिमित्त नेहमी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू किंवा मिठाईऐवजी त्यांनी कर्मचाऱ्यांना मोठी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला.

या बोनस वाटपाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा एका चंदेरी रंगाच्या ताटात व्यवस्थित मांडलेल्या दिसत आहेत. ताटातील नोटांची मोठी रास पाहून कर्मचारीही थक्क झाले.

सुरुवातीला कर्मचाऱ्यांना या भेटीचे आश्चर्य वाटले; मात्र मुंडे यांनी बोनसची रक्कम देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. काही कर्मचारी भावूक झाले, तर एका महिला कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले. यावेळी मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.

हे ही वाचा:

अवघ्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांची संपत्ती ४.६० लाख कोटींनी वाढली

आयसीस मॉड्यूल प्रकरणी पुण्यातील डॉ. अदनानअलीला सहा वर्षांचा तुरुंगवास

काँग्रेसला रिजिम चेंज हवाय….हा घ्या पुरावा !

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा

‘आज तक’ या इंडिया टुडेच्या सहयोगी वृत्तवाहिनीशी दूरध्वनीवरून बोलताना रामस्वरूप मुंडे यांनी या निर्णयामागील भावना स्पष्ट केली. ते म्हणाले की, आपण स्वतः गरिबीत दिवस काढले आहेत. त्यामुळे कुटुंबांना, विशेषतः सणासुदीच्या काळात, आर्थिक अडचणींचा सामना कसा करावा लागतो, याची आपल्याला जाणीव आहे.

त्यांच्या मते, दुकानात काम करणारे कर्मचारी हे केवळ कामगार नसून आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कापड व्यवसायात असलेल्या मुंडे यांनी कर्मचाऱ्यांची वर्षभरातील मेहनत आणि समर्पण व्यवसायाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.दिवाळीच्या सणासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजेच्या वस्तू खरेदी करता याव्यात आणि त्यांनी मनापासून आनंदाने दिवाळी साजरी करावी, अशी आपली इच्छा होती, असे मुंडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version