घरविशेषनागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसलेंची तलवार येणार महाराष्ट्रात

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसलेंची तलवार येणार महाराष्ट्रात

राज्य सरकारने केली खरेदी, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

- Advertisement -

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पोस्ट करत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली.

फडणवीसांनी म्हटले आहे की, हे सांगताना मला आनंद होतो आहे की, आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानी उच्चायोगाचे कर्मचारी मायदेशी रवाना

हृदय आणि मेंदूसाठी सर्वोत्तम आहे ‘ॐ’ चा उच्चार !

कौशल्य विकासासाठी भारताचा हे नवे नियोजन

पहलगाम हल्ला : बुधवार होणार सीसीएसची बैठक

दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १८१७ मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version