घरविशेषजम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

दहशतवादी हल्ल्यांचे पुरावे सुरक्षा दलाच्या हाती

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी चीन निर्मित शस्त्रे आणि दळणवळण साधने वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, जम्मू-काश्मीर आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रे, बॉडीसूट कॅमेरे आणि संपर्क साधने वापरत आहेत.

याव्यतिरिक्त, चीन पाकिस्तान सैन्याला ड्रोन, हँडग्रेनेड आणि इतर चीनी शस्त्रे देखील पाठवत आहे, ज्याचा वापर दहशतवादी गटांनी जम्मू हल्ल्यात केला आहे, ज्याचे पुरावे सुरक्षा दलांना अलीकडील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सापडले आहेत.या वर्षात तीन मोठे दहशतवादी हल्ले झाले असून, यातूनच हा संबंध उघड झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने पाच जवान शहीद झाले आणि दोन जखमी झाले .दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी लष्कर जम्मू-काश्मीरच्या पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये आणखी सैन्य आणणार आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक

हैदराबादचा क्रिकेटपटू झाला आयपीएस अधिकारी

मानवी तस्करीच्या संशयामुळे फ्रान्समध्ये रोखलेले विमान मुंबईला पोहोचले

इस्रायलने टिपला सिरीयात इराणचा अधिकारी

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तान चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या स्नायपर गनचा वापर भारतीय सैनिकांवर करतो.असाच एक हल्ला नोव्हेंबरमध्ये करण्यात आला होता ज्यामध्ये जम्मू सीमेवर लष्कराच्या जवानावर स्नायपर गनचा वापर करण्यात आला होता. या वर्षी तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या प्रतिमा चिनी बनावटीच्या बॉडी कॅमेऱ्यांमधून घेतल्या होत्या आणि त्या संपादित आणि मॉर्फ केल्या गेल्या होत्या, असा दावा सूत्रांनी केला आहे.तसेच दहशतवाद्यांनी दळणवळणासाठी वापरलेली एन्क्रिप्टेड मेसेजिंग उपकरणे देखील चिनी आहेत.

पाकिस्तानी लष्कराला चीनकडून शस्त्रे, कॅमेरे आणि दळणवळणाची साधने नियमितपणे मिळतात, परंतु पाकिस्तान भारतात घुसखोरी करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी या दहशतवादी संघटनांना ही साहित्ये उपलब्ध करून देतात.

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version