घरविशेषथायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

गणेशोत्सवात आरतीला एक वेगळे महत्त्व असते. घराघरातही आरतीच्या वेळी आजूबाजूचे सगळे लोक जमतात आणि गणपतीच्या आरतीत दंग होतात. पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला चक्क थायलंडचे काही बाप्पा भक्त आले होते आणि त्यांनीही सुखकर्ता, दुखहर्ता ही गणपतीची आरती म्हणत सर्वांना चकित केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी पंचकेदार मंदिराची सजावट करण्यात आली असून ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त येत आहेत. त्यावेळी या थायलंडच्या रहिवाशांनी आरतीत सहभाग घेतला. मुख्य म्हणजे सुखकर्ता, दुखहर्ता ही आरती त्यांना तोंडपाठ होती आणि ते उच्चारवाने आरती म्हणत होते तसेच आरतीचे ताट घेऊन त्यांनीही गणरायाला ओवाळले. गणपतीचा जयजयकारही त्यांनी केला.

रविवारी मोठ्या संख्येने भक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यावेळी थायलंडच्या या रहिवाशांनी त्यात सहभाग घेतला. कोरोनामुळे आपल्याला दोन वर्षे गणपतीला येता आले नव्हते पण आता आम्ही येऊ शकलो. खूप छान वाटले अशी प्रतिक्रिया थायलंडच्या एका रहिवाशाने दिली.

हे ही वाचा:

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

खरे तर थायलंडमध्ये गणेशाची पूजा केली जाते. थायलंडमध्ये श्रीगणेशाला फ्ररा फिकानेत असे म्हटले जाते. नवा व्यवसाय आणि लग्न किंवा इतर काही महत्त्वाच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. श्रीगणेशाच्या जन्माचा सोहळाही तिथे साजरा केला जातो.

जगातील सर्वात उंच अशी गणेशाची मूर्ती ही ब्राँझ धातूने बनविली असून ती ख्लोंग खुएन या थायलंडमधील शहरात आहे. ३९ मीटर इतकी तिची उंची आहे. येथील बौद्ध धर्मीय देखील गणेश जन्माचा सोहळा साजरा करतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version