घरविशेषइस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख ठार!

इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख ठार!

कमांडो जवानांसह अणुशास्त्रज्ञही ठार

इराण आणि इस्रायलमधील तणाव आता उघड युद्धाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (१३ जून) पहाटे इस्रायलने “ऑपरेशन रायझिंग लायन” अंतर्गत इस्रायलची राजधानी तेहरानवर व्यापक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी आणि इंटरनल रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने केली आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने यापूर्वी वृत्त दिले होते की, इराणच्या एलिट इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख हुसेन सलामी, गार्डचे आणखी एक वरिष्ठ अधिकारी आणि दोन अणुशास्त्रज्ञां मृत्युमुखी पडले आहेत. स्थानिक इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार इराणचे उच्च लष्करी अधिकारी तसेच अनेक वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इराणची राज्य वृत्तसंस्था IRNA ने देखील या हल्ल्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, मात्र त्यांची नावे दिली नाहीत. हल्ल्याच्या एक दिवस आधी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) वीस वर्षांत प्रथमच इराणवर अणु करारांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला होता.
हे ही वाचा  : 
इस्रालयने अण्वस्त्र असलेल्या केंद्रांवर केलेल्या हल्ल्यात इराणचे अनेक कमांडो जवान आणि अणुशास्त्रज्ञ ठार मारले गेल्याची माहिती आहे. याच दरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटले की, आम्ही इराणमधील मुख्य अण्वस्त्र  केंद्र असलेल्या नतांज येथील तळाला लक्ष्य केले. तसेच अणुबॉम्ब तयार करत असलेल्या वैज्ञानिकांनाही लक्ष्य करण्यात आले. याशिवाय, इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बेंजामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात अमेरिकेचा हात नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इस्रालयने संरक्षांसाठी हा हल्ला केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version