घरविशेषगणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये!

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निर्देश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.

गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत.

आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले.

हे ही वाचा : 

‘हिंदू दहशतवाद’, शरद पवारांसारख्या कटवाल्यांचा बाजार उठवणारा हा निकाल!

अमरनाथ यात्रा: भाविकांची संख्या ४ लाखांवर

इराण, भारतासारख्या देशांवर आपली इच्छा लादण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाबद्दल संघप्रमुख मोहन भागवत यांची श्रद्धांजली

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version