घरविशेषबंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा कहर; सोसायटीतून बाहेर पडायलाच ३० मिनिटे

बंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा कहर; सोसायटीतून बाहेर पडायलाच ३० मिनिटे

व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

बंगळुरूतील वाहतूक कोंडीची समस्या हा दिवसेंदिवस अधिक चिंतेचा विषय बनत असल्याचे दिसत आहे. नागरिकांना मुख्य रस्त्यावर पोहोचण्यापूर्वीच ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये निवासी सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरच वाहनांची मोठी रांग लागल्याचे दिसत आहे. या सोसायटीतून बाहेर पडण्यासाठी काही रहिवाशांना तब्बल ३० मिनिटे लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता हा व्हिडीओ शूट करण्यात आला. व्हिडीओमध्ये सुरुवातीला घराच्या बाहेरील रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसते. त्यानंतर कॅमेरा जवळच्या निवासी सोसायटीकडे वळवल्यावर, सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरही वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे दिसते.

हे ही वाचा:

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, मिड-टर्म परीक्षा ढकलल्या पुढे

चार वर्षांत १११ खासदार-आमदारांनी बदलला पक्ष

बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड…नंतर कळले ते होते गिटार!

२४ कॅरेट सोन्याचा भाव १.५१ लाखांवर

व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेच्या म्हणण्यानुसार, सोसायटीच्या बाहेर पडण्यासाठीच रहिवाशांना ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे. काही जणांना सोसायटीच्या गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी सुमारे अर्धा तास लागल्याचे तिने सांगितले. त्यामुळे बंगळुरूतील दैनंदिन प्रवासाची सुरुवात मुख्य रस्त्यावर नव्हे, तर घरातून बाहेर पडल्यापासूनच होत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. अनेकांनी सोसायटीच्या आतही ट्रॅफिक जाम पाहून आश्चर्य व्यक्त केले. काही यूजर्सनी तर बंगळुरूतील वाहतूक कोंडी आता निवासी परिसरातही पोहोचल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडी किती गंभीर पातळीवर पोहोचली आहे, यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version