घरविशेषमोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार तरुणांसाठी प्रशिक्षणाची संधी!

मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार तरुणांसाठी प्रशिक्षणाची संधी!

कौशल्य विकासमंत्री लोढा यांच्या मार्गर्शनात आयटीआयमध्ये अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम

देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहेत. तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत.

कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, अशा होतकरू युवकांना आणि युवतींना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. स्थानिक उद्योग आस्थापनांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि प्रशिक्षण त्याच जिल्ह्यात मिळाल्याने तरुणांना आपला जिल्हा सोडून अन्य ठिकाणी रोजगारासाठी जावे लागणार नाही.

हे ही वाचा : 

‘गब्बर सिंग टॅक्स’ म्हणून हिणवणारे आता श्रेय घ्यायला आले!

बालाकोटनंतर वेगवेगळे धडे; ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई शक्तीचा वापर!

कॉंग्रेस आमदार म्हणतो, आदिवासी हिंदू नाहीत!

मुंबईत १.५ लाख घरगुती अन ६५०० सार्वजनिक गणपतींचे विसर्जन, पोलीसही सज्ज

उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरु होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.

अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत प्रशिक्षणार्थींना दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version