घरविशेषमहाराष्ट्रात पोलीस खात्यात मोठे फेरबदल

महाराष्ट्रात पोलीस खात्यात मोठे फेरबदल

महाराष्ट्रात पोलीस खात्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदली करण्यात आली आहे. यात आयपीएस अधिकारी के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई, विवके फणसळकर अशा महत्वाच्या नावांचा समावेश आहे.

मंगळवार, ४ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई आणि विवेक व्ही. फणसळकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ठाणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार ठाणे पोलिस आयुक्तालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश मेखला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार इम्तियाज जलील यांची मागणी मान्य करणार का?

बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध

 

या बदल्यांमध्ये के. वेंकटेशम यांची विशेष कृती अभियान, महाराष्ट्र राज्य मुंबई येथून संचालक नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. संदीप बिश्रोई यांना लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून महासंचालक, न्यायिक व तांत्रिक, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. तर व्ही.व्ही. फणसळकर यांची पोलिस आयुक्त, ठाणे शहर ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version