घरविशेषरायगडमध्ये पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

रायगडमध्ये पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

परिसरात शोककळा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात नवगाव परिसरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. रामधरनेश्वर पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशिका नितीन पवार (३) आणि संजना संदीप पवार (८) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने रामधरनेश्वर आदिवासी वाडीवर शोककळा पसरली आहे. दोन्ही मुली तलावाजवळ खेळत असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिका आणि संजना या त्यांच्या मैत्रिणीसोबत खेळण्यासाठी रामधरनेश्वर पाझर तलावाच्या परिसरात गेल्या होत्या. खेळता खेळता दोघींचा पाण्यात तोल गेला आणि त्या तलावात बुडाल्या. हा प्रकार त्यांच्या मैत्रिणीच्या लक्षात येताच तिने घाबरलेल्या अवस्थेत वाडीकडे धाव घेत नागरिकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेत दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
हेन्री कगन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल

घ्या, काँग्रेसला बॅलेटनेही बुडवले…

भारत, इस्रायलसमोर इस्लामी दहशतवादी हल्ल्यांच्या लाटेची भीती

दिल्लीच्या सीमापुरीत चार मजली इमारत कोसळली
मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोन्ही मुलींना मृत घोषित केले. अवघ्या तीन आणि आठ वर्षांच्या चिमुकल्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दरम्यान, याच पाझर तलावात काही महिन्यांपूर्वी एका २४ वर्षीय तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे या तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तलावाच्या परिसरात लहान मुले जाऊ नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे आणि प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी अशा धोकादायक जलसाठ्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version