घरविशेषकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोहपुरुष’चे केले कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोहपुरुष’चे केले कौतुक

विवान कारुळकर यांनी दिली भेट

‘लोहपुरुष’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘न्यूज डंका’ने काढलेला दसरा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी हा अंक भेट म्हणून देण्यात आला. युवा विज्ञान लेखक तसेच उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांनी हे पुस्तक नितीन गडकरी यांना भेटस्वरूपात दिले. विवान कारुळकर यांनी लिहिलेली “द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स, द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजी, “एलोन मस्क: द मॅन हू बेंड्स रिऍलिटी ही पुस्तकेही नितीन गडकरी यांना देण्यात आली. तेव्हा आपण त्यावर अभिप्राय कळवू असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

आंदोलनमु्क्त दिल्लीसाठी सशस्त्र दलांचा बंदोबस्त वाढवला

‘बोरा’बिस्तरा गुंडाळून सगळे फरार!

पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली

टायगरवरील गोळीबारापूर्वी हल्लेखोरांच्या बंदुकीतून हॉटेलमध्ये सुटली गोळी

नितीन गडकरी यांनी या अंकाचे कौतुक केले असून या अंकाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेलांचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

‘न्यूज डंका’च्या माध्यमातून गेली पाच वर्षे दसरा दिवाळी अंक प्रकाशित केले जात असून त्यात नरेंद्र मोदी यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर काढण्यात आलेला अंक, नरेंद्र मोदींच्या २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवरील अंक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने काढलेला अंक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारा अमृतकाल हा अंक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दिनिमित्त काढलेला अंक यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version