घरविशेषआमिर खानने 'तिला' का सॅल्यूट केला नाही?

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

अभिनेता आमिर खान हा त्याच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या या ‘लाल सिंह चड्डा’ या सिनेमावर लोकांनी बायकोटची मागणी केली आहे. यादरम्यान, आमिर खान पुन्हा चर्चेत आला आहे, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी आमिर खान वगळता एका आर्मी ऑफिसरला सगळ्यांनी सॅल्युट केले. त्यावरून आमिर खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

लाल सिंह चड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानने ‘कौन बनेगा कोरडपती’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत एक महिला ऑफिसर मिताली या सुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी यावेळी, आर्मी ऑफिसर असल्याने सन्मान म्हणून सर्वांनी उठून तिला सॅल्यूट करण्याचे आवाहन अमिताभ यांनी केले. त्यावेळी सर्व प्रेक्षकांसह अमिताभ यांनी उठून या आर्मी ऑफिसरला सॅल्यूट केला. आमिर खान हा फक्त उभा होता त्याने मात्र तिला सॅल्यूट केला नाही. यावरून सोशल मीडियावर आमिर खानला ट्रोल केलं जात आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

पंतप्रधान मोदींनी क्रिकेटपटू जडेजाचं पत्र लिहून केलं कौतुक

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

दरम्यान, आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाला विरोध करण्यामागचे कारण म्हणजे त्याने काही वर्षांपूर्वी केले विधान आहे. त्यावेळी आमिर खान म्हणाला होता की, ‘भारतात वाढत्या असहिष्णुतेच्या अनेक घटनांमुळे मी सावध झालो आहे. त्यामुळे माझ्या पत्नी आणि मुलांना इथे सुरक्षित वाटत नाही. आमिर खानच्या या वक्तव्यामुळे आता चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #BoycottLalSinghChadha सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. लोक ‘लाल सिंह चढ्ढा’ वर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. चित्रपट कधीही न पाहण्याची लोक शपथ घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version