घरविशेषनोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी...

नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?

लेखक विक्रम संपथ यांचे वक्तव्य

लेखक आणि बँकिंग क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ विक्रम संपथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर आणि लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार ? असा सवाल लेखक विक्रम संपथ यांनी उपस्थित केला आहे.विक्रम संपथ यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.पुण्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समज – गैरसमज’ या विषयावर त्यांची मुलाखत घेण्यात आली.तेव्हा ते बोलत होते.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवात या कार्यक्रमात विक्रम संपथ याना विचारण्यात आले की, भारतीय चलनावर केवळ एकाच व्यक्तीचे छायाचित्र आपल्याकडे आहे. भविष्यात कधी सावरकरांचा आणि टिळकांचा फोटो चलनात दिसेल का? या प्रश्नाला उत्तर देताना विक्रम संपथ म्हणाले की, ‘मला तो दिवस आवडेल जेव्हा असे काही होईल, पण त्याचबरोबर नोटांवर सावरकरांसोबतच, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लाजपतराय, लोकमान्य टिळक यांचे फोटो देखील असायला हवेत. हे बाकीचे पण देशाचे हिरो आहेत.

हे ही वाचा:

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा

लोकसभेत टेलिकॉम विधेयक सादर

सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!

यामुळे त्यांचा फोटो देखील असायला हवा, असे विक्रम संपथ म्हणाले.इंडोनेशियामधील उदाहरण देत विक्रम संपथ म्हणाले, इंडोनेशियामध्ये जसे वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो नोटांवर असतात. तसे आपल्याकडे देखील असायला हवे.मात्र, विक्रम संपथ यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

विक्रम संपथ कोण आहेत
विक्रम संपथ यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला आहे. त्यांनी बँकिंगमध्ये काम केले. २००८ मध्ये त्यांनी म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याचा इतिहास प्रकाशित केला. त्याचबरोबर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र दोन भागांमध्ये लिहिलेली आहे. २०११ चा साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्यातील युवा पुरस्कार देखील विक्रम संपथ यांना मिळालेला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version