घरविशेषशेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार

शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

- Advertisement -

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मातीला नमन करून पूजन केले. जीवातजीव असेपर्यंत आपण मातीशी एकनिष्ठ राहणार असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा..

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी

‘कलम ३७० हे १९५७मध्येच रद्द करायला हवे होते’

लोकसहभाग वाढवून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करा!

मोदींना रोखण्यासाठी ‘चार आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला’…

ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मातीला वंदन करून पूजन केले.

यावेळी मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले की, मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत देशभर मातीच्या पूजनाचा आणि मातीला वंदन करण्याचा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मातीशी जोडले पाहिजे. मातीशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मतदारसंघात मेरी माटी, मेरा देश कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत. मात्र व्यस्त कामामुळे गावाकडे मातीचे पूजन करणे शक्य झाले नसल्याने, आज मुंबईत मातीला वंदन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version