घरबिजनेसहोर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटामुळे तीन तेलवाहू जहाजांना आग

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटामुळे तीन तेलवाहू जहाजांना आग

जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटांची मालिका घडल्याने आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीत मोठी खळबळ उडाली आहे. समुद्रात पेरण्यात आलेल्या सुरुंगांवर तीन तेलवाहू जहाजे आदळल्याने तिन्ही जहाजांना भीषण आग लागली. या घटनेची माहिती इराणच्या लष्कराने दिली असून, संवेदनशील सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या घटनेचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारे पहिले तेलवाहू जहाज पूर्वेकडील भागात पेरण्यात आलेल्या सुरुंगावर आदळले. त्यानंतर दुपारच्या सुमारास आणखी दोन तेलवाहू जहाजे याच प्रकारच्या सुरुंगांच्या संपर्कात आली. धडक बसताच मोठे स्फोट झाले आणि तिन्ही जहाजांना आग लागली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी नौदलाच्या हवाल्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच, आग लागलेली दोन जहाजे बंदी घालण्यात आलेल्या सागरी मार्गाचा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, असा दावा इराणच्या लष्कराने केला आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘परकीय हात’

अमेरिकेत डिझेलच्या दरात मोठी घसरण

ललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

मेट्रोचा विस्तार मोठा, पण किती होईल नफा-तोटा?

या भीषण घटनेनंतर इराणच्या लष्कराने तेल आणि नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या अन्य जहाजांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी पहाटे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच मार्गावरून पुढे जाणाऱ्या आणखी दोन जहाजांना इशारा देण्यात आला. संभाव्य धोक्याची जाणीव होताच या जहाजांनी आपला मार्ग बदलला आणि फारसच्या खाडीकडे माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता धोका जागतिक तेल पुरवठा साखळीसाठी चिंतेचा विषय ठरत असून, या मार्गावरील सागरी वाहतूक आणि सुरक्षेवर आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version