घरबिजनेसव्यापारी संघटनेचा सवाल...प्रदूषणासाठी फक्त फटाकेच कसे जबाबदार?

व्यापारी संघटनेचा सवाल…प्रदूषणासाठी फक्त फटाकेच कसे जबाबदार?

दिल्लीमध्ये दिवाळीच्या दिवशी फोडण्यात आलेल्या फटाक्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि उद्योजकांची प्रमुख संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. आम्ही प्रदूषणाच्या पूर्णपणे विरोधात असून दिल्लीची हवा स्वच्छ व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, प्रदूषणासाठी केवळ दिवाळीच्या एका दिवसाच्या फटाक्यांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी म्हटले आहे.

प्रदूषणाच्या नावाखाली केवळ फटाक्यांच्या व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आणणे हा समस्येवरील उपाय नाही, असे सीटीआयने स्पष्ट केले. बृजेश गोयल म्हणाले की, दिल्लीतील अनेक फटाके व्यावसायिक त्यांच्या संघटनेशी जोडलेले आहेत. त्यांना पुढील वर्षी दिल्लीमध्ये फटाक्यांची दुकाने न लावण्याचे आणि फटाक्यांची विक्री न करण्याचे आवाहन करून त्यासाठी तयारही करता येईल. मात्र, त्याबदल्यात ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत दिल्लीत प्रदूषण होणार नाही आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या पुढे जाणार नाही, याची हमी एखाद्या विश्वासार्ह आणि जबाबदार संस्था किंवा संघटनेने द्यावी.

सीटीआयने उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, फटाके ८ नोव्हेंबर रोजी फोडण्यात आले. मात्र, ५, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजीही दिल्लीतील एक्यूआय ३५० ते ४०० दरम्यान नोंदवण्यात आला होता. त्या वेळी झालेल्या प्रदूषणाला जबाबदार कोण होते? कारण त्या दिवसांमध्ये फटाके फोडण्यात आले नव्हते.

दिल्लीतील प्रदूषणाचे मूळ कारण फटाके नसल्याचे हे वास्तव सिद्ध करते, असे सीटीआयचे म्हणणे आहे. फटाक्यांना दोष देणे सर्वात सोपे आहे; मात्र वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीतच प्रदूषणाची पातळी सर्वोच्च का असते? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये प्रदूषणाची समस्या का जाणवत नाही, असा सवालही संघटनेने उपस्थित केला.

हे ही वाचा:

वय लहान वैभवच्या हाती बिहारची कमान!

बलुचमध्ये पाक सैन्याचे पाच जवान ठार

मुंबईत दिवाळीच्या दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना

फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने

याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे. या महिन्यांमध्ये शेजारील राज्यांमध्ये शेतातील पराली जाळली जात नाही. पराली जाळण्यास सुरुवात होताच दिल्लीतील नागरिकांचा श्वास कोंडू लागतो आणि पराली जाळणे बंद झाल्यानंतर दिल्लीची हवा स्वच्छ होऊ लागते. हा थेट संबंध कोणापासूनही लपलेला नाही. मग दरवर्षी पराली जाळण्याच्या घटनांवर कारवाई करण्याऐवजी दिवाळीच्या फटाक्यांनाच दोष का दिला जातो, असा प्रश्न सीटीआयने उपस्थित केला.

फटाके उद्योगाशी देशभरातील जवळपास १० लाख लोक जोडलेले आहेत. शिवकाशीमधील कारखान्यांपासून ते दिल्लीतील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांनी कायदेशीर परवानग्या घेऊन परवाने, मालसाठा आणि भांडवलामध्ये गुंतवणूक केलेली आहे. एक छोटा व्यापारी वर्षभर भांडवल गुंतवतो आणि दिवाळीच्या केवळ १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाची कमाई करतो. ऐनवेळी बंदी घातल्यामुळे त्याची संपूर्ण गुंतवणूक बुडते. व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार हरित फटाके तयार केले असतानाही त्यांनाच वारंवार लक्ष्य का केले जाते, असा सवाल संघटनेने केला.

सीटीआयने म्हटले आहे की, मुले वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे नवीन कपडे, मिठाई, पणत्या आणि फटाक्यांचा आनंद असतो. सणाचा अर्थ केवळ निर्बंध आणि बंदी आहे, असा संदेश आम्हाला मुलांना द्यायचा नाही. आमची भूमिका कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मात्र, पर्यावरणाच्या नावाखाली कारवाई करताना कठोर निर्बंध केवळ हिंदू सणांवरच का लादले जातात, हा प्रश्न उपस्थित करण्याचा आम्हाला अधिकार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version