पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात बलुच रिपब्लिकन गार्ड्सने (बीआरजी) केलेल्या दोन हल्ल्यांत पाच सुरक्षारक्षक ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. कच्छी जिल्ह्यातील बाग परिसरात पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त छावणीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर बोलान परिसरात लष्करी ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या दोन्ही हल्ल्यांत अनेक जण जखमी झाल्याचेही बीआरजीने म्हटले आहे.
माहितीनुसार, रविवारी झालेल्या पहिल्या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. सुमारे दोन तासांनंतर बोलानमध्ये लष्करी ताफ्यावर रॉकेट आणि अन्य अवजड शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. यात चार सुरक्षारक्षक ठार झाले असून लष्करी वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
भारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला
चिनी व्लॉगर्सकडून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न?
पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या
बालशोषणाचे २० हजार फोटो-व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी सैफुद्दीन मलिकला अटक
बीआरजीने ३० ऑक्टोबरला ‘आमिर एअरो गार्डियन्स’ या ड्रोन युनिटची स्थापना जाहीर केली होती. दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीनेही (बीएलए) अलीकडे ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यात सुराब, खारान आणि कलात जिल्ह्यांत केलेल्या तीन कारवायांत सातहून अधिक पाकिस्तानी सुरक्षारक्षक ठार केल्याचा दावा बीएलएने केला होता.
