केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात मोहीम राबवत, नक्षलमुक्त भारताचे निश्चित केलेले लक्ष्य साध्य केले. यानंतर आता सरकारने आपला मोर्चा अमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्याकडे वळवला आहे. देशातील तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात ढकलणाऱ्या आणि सीमापार तस्करीच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या नेटवर्कचा समूळ नायनाट करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०२९ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन ट्रायडेंट’च्या माध्यमातून अमली पदार्थ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय जाळ्यावर मोठा प्रहार करण्यात आला आहे.
केंद्रीय यंत्रणा आणि आसाम, मिझोराम व मणिपूर पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी या तीन राज्यांतील ३८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली. या मोहिमेत १८ जणांना अटक करण्यात आली असून, १०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांचा खुलासा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईची माहिती दिली.
या कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी १,४२४ बँक खाती गोठवली असून, १७.८२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय ५०० डिटोनेटर आणि १२ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या कारवाईतून अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे मोठे जाळे समोर आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी केंद्रीय तपास यंत्रणा आणि आसाम, मिझोराम व मणिपूरच्या पोलिस दलांचे शाह यांनी अभिनंदन केले.
Modi Govt deals another lethal blow against drugs with Operation Trident.
Our agencies launched a barrage of simultaneous crackdowns across 38 locations in Assam, Mizoram and Manipur on 23 October, smashing an international narco-cartel. The operation revealed ₹100 crore worth of hawala transactions, froze 1,424 bank accounts, attached properties worth ₹17.82 crore, seized 500 detonators and ₹12 lakh in cash, and led to the arrest of 18 people.
The network trafficked narcotics across the borders of India, Myanmar and Bangladesh through the Death Triangle Corridor. The offensive attests to India’s Himalayan resolve to realise the mission of eradicating every drug network by 31 December 2029. India will hammer until the last nail is driven into the coffin of drug cartels.
Heartiest congratulations to the anti-narcotics team comprising central agencies, and police forces of the three states.
— Amit Shah (@AmitShah) October 25, 2026
या आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कमार्फत भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती भागांतून अमली पदार्थांची वाहतूक केली जात होती. या मार्गाचा उल्लेख अमित शाह यांनी ‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’ असा केला. ईशान्य भारतातील सीमावर्ती भागांचा वापर करून होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि त्यामागील आर्थिक व्यवहार उघड करणे, हे अशा कारवायांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
हे ही वाचा:
विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’
मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!
जामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष
टायगरवरील हल्ल्यानंतर आरोपींना मिळत होते मीडियातून अपडेट्स
२०२९ पर्यंत अमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्याचे लक्ष्य
देशातील अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रत्येक नेटवर्क ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत नष्ट करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचा अमित शाह यांनी पुनरुच्चार केला. तस्करीचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत कारवाई सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अमित शाह यांनी म्हटले आहे की, गृह मंत्रालय २०२६ सालाचा उर्वरित काळ आणि त्यानंतरची तीन वर्षे देशाला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी समर्पित करेल. त्यांनी देशभरातील पोलीस दलांना नशा मुक्त भारत आराखड्याच्या अंमलबजावणीत संपूर्ण सहभाग घेण्याचे आवाहनही केले आहे. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’चे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांना मादक पदार्थांच्या व्यसनापासून वाचवणे हे देखील महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
