घरक्राईमनामापतंग कापल्यावरून १२ वर्षांच्या शहजादने केले देववर चाकूने वार

पतंग कापल्यावरून १२ वर्षांच्या शहजादने केले देववर चाकूने वार

- Advertisement -

पतंग उडवण्यावरून झालेल्या वादातून १२ वर्षांच्या मुलाने त्याच वयाच्या दुसऱ्या मुलावर चाकूने किमान चार वार केल्याची धक्कादायक घटना फरीदाबादमधील करुणा कॉलनीत सोमवारी घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. शहजाद याने आपला शेजारी असलेल्या देव नावाच्या मुलावर हा हल्ला केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुले आपापल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत होती. त्यावेळी पीडित मुलाने हल्लेखोर मुलाच्या पतंगाचा दोर कापला. त्यामुळे संतप्त झालेल्या हल्लेखोर मुलाने खाली येत पीडित मुलावर हल्ला केला. त्यासाठी तो घरातून भाजी कापण्याचा चाकू घेऊन आला.

हल्ल्यानंतर जखमी मुलाच्या किंकाळ्या ऐकून त्याचे कुटुंबीय घराबाहेर आले. त्यावेळी मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. फरीदाबाद पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी यशपाल यादव यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी तातडीने जखमी मुलाला बादशाह खान शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुलाला सेक्टर १९ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

जुहू इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्यल्या अस्वच्छतेवर तुकाराम मुंढेची कारवाई

पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीवरून वाद

देशात साखर स्वस्त; आयातदार झाले त्रस्त

अमेरिकेची मानवरहित पाणबुडी इराणच्या ताब्यात?

 

आतड्यांनाही गंभीर दुखापत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूच्या वारांमुळे मुलाच्या आतड्यांना दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. मात्र, प्रकृती अद्याप गंभीर असल्याने त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. जखमी मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खेडीपुल पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील १२ वर्षांच्या हल्लेखोर मुलाला कायद्याच्या संघर्षातील बालक म्हणून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. बाल न्याय कायदा, २०१५ नुसार, १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचा आरोप असल्यास बाल न्याय मंडळाच्या प्राथमिक मूल्यांकनानंतर काही परिस्थितीत प्रौढांसाठी लागू असलेल्या तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते. मात्र, १२ वर्षांचे मूल बाल न्यायव्यवस्थेच्या कक्षेत येते आणि त्याच्याशी संबंधित प्रकरण बाल न्याय मंडळामार्फत हाताळले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version