घरक्राईमनामानॅशनल पार्कजवळच्या फ्लायओव्हरवरील खड्ड्याने घेतला जोडप्याचा बळी

नॅशनल पार्कजवळच्या फ्लायओव्हरवरील खड्ड्याने घेतला जोडप्याचा बळी

मागून येणाऱ्या ट्रकखाली सापडले जोडपे

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील फ्लायओव्हरवर असलेल्या खड्ड्यांनी एका जोडप्याचा बळी घेतला. नझीर शहा (४३) आणि त्यांची पत्नी छाया खिलारे (४३) नायगाव येथे टीव्ही शूटसाठी बाईकवरून जात होते. पश्चिम द्रूतगती मार्गावरील या फ्लायओव्हरवरून हे जोडपे जात होते. त्यावेळी खड्डे चुकवताना नझीर शहा यांचे बाईकवरील नियंत्रण सुटले. हे जोडपे रस्त्यावर पडले. मागून येणाऱ्या ट्रकखाली हे जोडपे आले आणि त्यात त्यांचे प्राण गेले.

ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला पण वेळेवर त्याला ब्रेक दाबता आला नाही. या दोघांनीही हेल्मेट घातले होते पण ट्रक अंगावरून गेल्यामुळे ते जबर जखमी झाले. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याने दिली आहे. या जोडप्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता.

हे ही वाचा:

तुरुंगी सर्वसुखी असा कैदी नंबर ४६२२ आहे

भाजपावर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी अभिनेत्याला दिली ‘सुपारी’

पाकिस्तानात अत्याचाराचा कहर, विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून चाटायला लावल्या चपला

‘खान’दान आता संपुष्टात आलंय !

 

या ट्रकचा चालक सलीम शेख (३७) या ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूला निमंत्रण देणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शेखने हे पोलिसांना सांगितले की, ते जोडपे आधीच रस्त्यावर पडले होते आणि आपण ट्रक थांबवू शकलो नाही. त्यामुळे त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. शहा हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रात कार्यरत होते तर त्यांची बायको मेकअप आर्टिस्ट होती. याआधी हे जोडपे मिरा रोडला राहात होते पण नंतर अंधेरीला आले. तिथे शहा यांची आई राहात होती. कामावर गेल्यानंतर आपल्या मुलाला आई सांभाळू शकेल, या हेतूने शहा हे अंधेरीला राहायला आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version