घरक्राईमनामाकावड यात्रेदरम्यान वाद, सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या!

कावड यात्रेदरम्यान वाद, सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या!

पोलिसांकडून तीन आरोपींना अटक 

हरिद्वारमधील कावड यात्रेदरम्यान गावातील काही लोकांशी झालेल्या भांडणानंतर, २८ जुलै रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाची त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कृष्ण कुमार असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी आज (२ ऑगस्ट) तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, जवान कृष्ण हे सुमारे ३० वर्षांचे होते आणि ते रजेवर होते. “कावड यात्रेदरम्यान, काही दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांनी त्याच्याशी वाद घातला होता. त्यांची ओळख पटली आहे,” असे स्थानिक पोलिस अधिकारी निरीक्षक लाल सिंग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

हरिद्वारच्या यात्रेला जाण्यापूर्वीच जवान कृष्ण यांना मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. कृष्णव्यतिरिक्त, आरोपीने आनंद उर्फ पाहिया या आणखी एका व्यक्तीला मारण्याची योजना आखली होती, असे पोलिसांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी निशांत आणि अजय यांना खून प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखले आहे.

हे ही वाचा : 

बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप!

‘नाईट वॉचमन’ने इंग्लंडला दिवसा आकाशात तारे दाखवले!

मिठी नदी सफाई घोटाळ्यात ईडीची कारवाई

शेतकरी आणि लघुउद्योगांचे कल्याण यालाच ‘सर्वोच्च प्राधान्य’

कावड यात्रेला जाण्यापूर्वी अजयने त्याची विनापरवाना बंदूक मोहित नावाच्या माणसाकडे सोडली होती. अजयसोबत प्रवीण उर्फ मेंढक देखील सामील होता. या हत्येसाठी सागर नावाच्या माणसाची कार वापरली गेली होती. अजय आणि निशांत सागरच्या कारने खेरी दमकन गावात गेले. यानंतर अजय आणि निशांतने जवानाला गोळ्या घातल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांनी कार चालक सागर, प्रवीण उर्फ मेंढक आणि मोहित यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी निशांत आणि अजय अजूनही फरार आहेत. मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक मूल आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version