घरक्राईमनामातृतीयपंथीयाच्या वेशात घरात घुसून लैंगिक अत्याचार

तृतीयपंथीयाच्या वेशात घरात घुसून लैंगिक अत्याचार

पवई पोलिसांची चार तासांत कारवाई

तृतीयपंथीच्या वेशात आलेल्या एका बहुरूपियाने नजर काढण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश मिळवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार पवई येथे घडला आहे.

पवई पोलिसांनी मात्र अवघ्या चार तासांत या गुन्ह्याचा छडा लावुन कळवा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.या प्रकरणी पवई पोलिसांनी तृतीयपंथीयाच्या वेषात आलेल्या अनिल शेषराव शिंदे (२८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरी असताना तृतीयपंथीच्या वेशात ‘अनिल’ नावाचा एक व्यक्ती घरात आला. नजर काढण्याच्या बहाण्याने त्याने घरात प्रवेश मिळवून बेडरूममध्ये गेला. त्यानंतर महिलेच्या जवळीक साधत तिला तिच्या चारित्र्याबाबत बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

विमानतळावर सरकारी वाहनचालकाची आत्महत्या

कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…

पोलिसांच्या बळासह आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी

रिलायन्सची ₹२.७३ लाख कोटींची मोठी ऊर्जा योजना

या घटनेनंतर पवई पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

आरोपीचा शोध घेत असताना तो एका रिक्षातून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याचा वापर करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तो कळवा येथील झोपडपट्टी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि अवघ्या चार तासांत गंभीर गुन्ह्याचा उलगडा केला.

तपासादरम्यान आरोपी हा तृतीयपंथी नसून भीक मागण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीयाचा वेश धारण करणारा बहुरूपी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अनिल शेषराव शिंदे हा २८ वर्षांचा असून तो कळवा परिसरातील गोलाईनगर येथे राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला १९ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने केली आहे.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना, तसेच भिक्षा मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सहजपणे घरात प्रवेश देऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाशी १००/११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version