घरक्राईमनामाअमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

पंजाब रेल्वे स्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई

पंजाबमधील शंभू-राजपुरा रेल्वेमार्गावरील स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा (केझेडएफ) समर्थक असल्याचा आरोप असलेल्या सुरिंदर सिंह ऊर्फ ठिकरीवाल याला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर दिल्लीत अटक करण्यात आली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन भारतात पाठवले. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनआयएने त्याला अटक केली.

२७ एप्रिल २०२६ रोजी पंजाबमधील शंभू आणि राजपुरा रेल्वे स्थानकांदरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (डीएफसीसीआयएल) रेल्वेमार्गावर स्फोट झाला होता. या स्फोटातून केझेडएफच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवणे हा कट असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्फोटानंतर सुरिंदर सिंहने आपल्या फेसबुक खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले. या व्हिडिओत त्याने स्फोटाचे समर्थन केले होते. तसेच या कटात सहभागी असलेल्या आरोपींचे समर्थन केले होते. स्फोट घडवताना मृत्यू झालेल्या जग्रूप सिंह याचेही त्याने गौरव केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले

राहुल गांधी हे मेंदू दिव्यांग

जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम

एनआयएच्या म्हणण्यानुसार, सुरिंदर सिंहने प्रतिबंधित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा उल्लेख ‘कौमी ऑर्गनायझेशन’ असा केला होता. तसेच घोषित दहशतवादी रंजीत सिंह ऊर्फ नीता याला ‘कौमचा जनरल’ असे संबोधले होते. तपासादरम्यान एनआयएने त्याच्याविरोधात लूकआउट सर्क्युलरही जारी केले होते. पंजाबमधील विविध जिल्ह्यांत त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपास यंत्रणेने दिली आहे. सुरिंदर सिंहच्या अटकेमुळे या रेल्वे स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. या कटामागील परदेशातील साथीदार, आर्थिक मदत आणि इतर यंत्रणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version