घरक्राईमनामामहेश मांजरेकरांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

महेश मांजरेकरांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

‘नाय वरन-भात लोन्चा’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. माहीम पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा यासाठी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने मांजरेकर यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पॉक्सो कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

महेश मांजरेकर यांनी पॉक्सो आणि आयटी कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. पण न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने महेश मांजरेकरांना नियमित कोर्टाकडे दाद मागण्यास सांगितले आहे. पण ते खंडपीठ उपलब्ध नसल्याने महेश मांजरेकरांनी याचिका दाखल करताना दोन दिवस अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

हे ही वाचा : 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची लवकरच सुटका

चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना अटक

‘मुख्यमंत्र्यांमध्ये धमक नसल्याने ते संजय राऊतांना पुढे करतात’

नवाब मालिकांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल…

महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यांच्या या चित्रपटाविरुद्ध पॉक्सो न्यायालयात धाव घेण्यात आली होती. तसेच महेश मांजरेकर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला माहिम पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने विशेष पोक्सो न्यायालयात धाव घेतली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version