घरक्राईमनामामुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

१५ ऑगस्टपूर्वी मुंबई उडवण्याचा धमकी देणाऱ्याचा दावा

- Advertisement -

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. महापौरांच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा संदेश आला असून, यामध्ये १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत साखळी स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून मुंबई पोलीस आणि यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
* धमकीचे लक्ष्य: महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
* इशारा: नागरिकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये आणि मेट्रोने प्रवास करू नये, असा भीतीदायक इशारा या मेलमध्ये देण्यात आला आहे.
* खलिस्तान समर्थक उल्लेख: मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही विशिष्ट व्यक्तींची नावेदेखील नमूद करण्यात आली आहेत.
* आधीही मिळाले होते धमकीचे ई-मेल: सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वीही महापौर रितू तावडे यांना अशा प्रकारे दोन वेळा धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते.
हे ही वाचा:
रेल्वे स्थानकावरील फ्री वाय-फाय अन् लाखो गायब!

गिलच्या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढली!

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्याच टप्प्यात ₹५,०२८ कोटींचे वितरण

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयला मोठा दिलासा

पोलिसांकडून तपास सुरू
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या संबंधित विभागांनी तात्काळ याची दखल घेतली असून कसून तपास सुरू केला आहे. हा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्याचा आयपी ऍड्रेस (IP Address) आणि मूळ स्रोत शोधण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबईतील प्रमुख प्रतिष्ठाने आणि गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version