घरक्राईमनामाNIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे

NIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे

केंद्रीय तपास यंत्रणेने सोमवार, ९ मे रोजी डी कंपनीसंबंधी कारवाईला सुरुवात केल्याची माहिती आहे. NIA मुंबईत २० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दाऊदशी संबंधित असलेल्या शार्पशुटर्सवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ‘टीव्ही ९’ने दिली आहे. मुंबईतील बोरिवली, मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, सांताक्रूझ, भेंडी बाजार या ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांच्या २० हून अधिक ठिकाणांवर NIA कडून छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये शार्प शुटर्स, तस्कर आणि अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

NIA ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, इकबाल मिर्ची, जावेद चिकना आणि इतर लोकांसोबत दाऊदने आपले हातपाय पसरले होते. भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती NIA ने दिली असून त्या पार्श्वभूमिवरच कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

मुंबईत १२ मार्च १९९३ या दिवशी एकापाठोपाठ एक झालेल्या १३ बॉम्बस्फोटांनी शहर हादरलं होतं. २५७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ७५० लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊदच्या संबंधित अनेकांवर काही दिवसांपूर्वी ईडीने कारवाई केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version