घरक्राईमनामाअवघ्या दोन हजारांसाठी वडिलांनी केला मुलाचा खून, दादरच्या गोखले रोडवरील घटना

अवघ्या दोन हजारांसाठी वडिलांनी केला मुलाचा खून, दादरच्या गोखले रोडवरील घटना

मुलाने २ हजार रुपये चोरी करून दारूवर खर्च केल्याच्या संशयावरून ८० वर्षीय वडिलांनी ३५ वर्षीय मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना दादरच्या गोखले रोड फुटपाथ येथे घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वडिलांना अटक केली आहे.

युवराज काळे (८०)असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव असून अन्वर काळे (३५) असे मृत मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर काळे हा आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून मजुरी करण्यासाठी मुंबईत आला होता.काही दिवसांपूर्वी त्याचे वडील युवराज काळे हे मुलाच्या शोध घेत काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते.दोघे दादर च्या गोखले रोड येथील फुटपाथवर राहत होते,मुलाला आणि वडिलांना दारूचे भयंकर व्यसन होते. त्यात २९ सप्टेंबर रोजी अन्वर याने वडिलांच्या बॅगेतून २ हजार रुपये चोरले आणि ते पैसे दारूवर उडवले होते.

हे ही वाचा:

परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक

लाडकी बहीण योजना : सेवा शुल्क कपात केला तर कारवाई

खटला दाखल होताच जमिनी परत करण्याचा निर्णय

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

मुलाने पैसे चोरल्याच्या संशयावरून ३० सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले या भांडणातून युवराज काळे याने अन्वरवर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात अन्वर हा जखमी झाला, त्याला वडिलांनी केईएम रुग्णालयात दाखल केले होते. अन्वर याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी वडील युवराज काळे यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.युवराज काळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version