घरक्राईमनामाडंपरच्या धडकेत १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू, डंपर चालकाला अटक

डंपरच्या धडकेत १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू, डंपर चालकाला अटक

पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपर चालकाला नागरिकांनी पकडले

वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेत निघालेल्या १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनी डंपर धडकेत ठार झाली असून तिचे वडील जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी गोरेगाव पूर्व येथे झाला असून वडिलांना नजीकच्या रुगणाल्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

विन्मयी मोरे (१३) असे दुर्देवी विद्यार्थीनीचे नाव असून रमेश मोरे तिचे वडील आहे. विन्मयी मोरे ही मालाड पूर्वेत राहण्यास होती. मंगळवारी सकाळी विण्मयी ही वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेत जात असताना गोरेगाव पूर्व ओबोरॉय मॉल जवळ भरधाव वेगात असलेल्या डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.या भीषण अपघातात विन्मयी ही जागीच ठार झाली आणि तिचे वडील रमेश मोरे हे जखमी झाले.

हे ही वाचा:

अवघ्या दोन हजारांसाठी वडिलांनी केला मुलाचा खून, दादरच्या गोखले रोडवरील घटना

परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक

महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

अयोध्या बलात्कार प्रकरण : राजू खानचा डीएनए नमुना गर्भाशी जुळला

या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपर चालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते, अपघाताची माहिती मिळताच दिंडीशी पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला आणि वडिलांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विनमयी ला मृत घोषित करून रमेश मोरे याना उपचारासाठी दाखल करण्यात आले.या अपघातप्रकरणी पोलिसांनी डंपर चालक राहुल जाधव याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा डदाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version