घरक्राईमनामाजम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील तीर्थस्थळावरून यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर ही बस दरीत कोसळली. ही बस शिवखोरी मंदिरापासून कटरा येथे परतत होती. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

अपघातस्थळी मृतदेह दिसत होते. स्थानिकांनी लगेचच मदतकार्य सुरू केले. तर, रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला मदतीसाठी सज्ज होती. शिवखोरी मंदिराहून ही ५३ आसनी बस कटाराकडे निघाली होती. कटारा येथून वैष्णोदेवी यात्रेला सुरुवात होते. या प्रवासादरम्यान जेव्हा बस जंगल परिसरात पोहोचली, तेहा दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. त्यावेळी घाबरलेल्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस खोल दरीत कोसळली.

लष्करातर्फे येथे उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. घटनास्थळी पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या पोहोचल्या होत्या. दहशतवाद्यांच्या शोधासाठी भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा गट राजौरी, पुंछ आणि रेयासी येथील वरील भागांत लपून बसला आहे.

हे ही वाचा:

मुरलीअण्णांना लॉटरी !

गडकरींची मंत्रीपदाची हॅट्रिक!

बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !

गोयल यांची पुन्हा वर्णी !

रेयासी जिल्ह्यात शेजारील राजौरी आणि पूँछ जिल्ह्याच्या तुलनेत दहशतवादी कारवाया झालेल्या नव्हत्या. मात्र जिल्ह्यात प्रथमच हिंचाचाराची मोठी घटना घडली. सुरुवातीच्या वृत्तानुसार, दोन बुरखाधारी दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार करून बसचालकाला लक्ष्य केले. यावेळी ही बस दरीत कोसळली. हे ठिकाण रेसई आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमाभागात आहे. यापूर्वीही या परिसरात दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. या प्रकारानंतर पोलिस आणि सुरक्षादांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version