घरक्राईमनामादहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड

दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी मॉड्यूलशी पाकिस्तानी संबंध उघड केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. यापूर्वी याचं प्रकरणाशी संबंधित दोन संशयितांना अटक करण्यात आली होती, ज्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे.

कारवाई दरम्यान, पोलिसांनी आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे काही भागही जप्त केले आहेत. माहितीनुसार, आरोपी हे वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होते, ज्यांची आता पडताळणी केली जात आहे.

तपासकर्त्यांच्या मते, या गटाचा प्रमुख सदस्य अशरफ दानिश हा भारतातून हे मॉड्यूल चालवत होता. तसेच तो एन्क्रिप्टेड आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होता. तपासात असे दिसून आले आहे की, संशयितांनी भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या नेटवर्कमध्ये भरती करण्यासाठी या चॅनेलचा वापर केला. तसेच या गटाने जातीय द्वेष पसरवणे आणि धार्मिक सलोखा बिघडवणे या उद्देशाने अनेक ऑनलाइन ग्रुप चालवले होते.

या प्रकरणाशी संबंधित चार ते पाच राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये जवळपास आठ संशयितांची चौकशी करण्यात आली. आतापर्यंत पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यात दिल्लीतील दोन आणि मध्य प्रदेश, हैदराबाद आणि रांची येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की म्हणाल्या, मोदीजींचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव!

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा प्रताप अंगरक्षकाला चापट; शिवीगाळ |

…म्हणून नेपाळ ढेपाळला! |

राधाकृष्णनच; ‘इंडी आघाडी’ गार, एनडीए ४५० पार |

दानिशच्या ताब्यातून, स्पेशल सेलने एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत दारूगोळा, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सल्फर पावडर, तांब्याचे पत्रे, बॉल बेअरिंग्ज, स्ट्रिप वायर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. अधिकाऱ्यांचा असा संशय आहे की हे साहित्य शस्त्रे आणि स्फोटके बनवण्यासाठी होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version