घरक्राईमनामाकोस्टल रोडवरून खाली कोसळली भरधाव बीएमडब्ल्यू; तिघे मृत्युमुखी

कोस्टल रोडवरून खाली कोसळली भरधाव बीएमडब्ल्यू; तिघे मृत्युमुखी

एक गंभीर जखमी

मरीन ड्राइव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला. लाला कॉलेजसमोरील लोटस जेटीजवळ रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार अतिवेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पुलावरून ही गाडी वेगाने खाली कोसळली आणि दोनवेळा पलटी खात आदळली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा:

द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!

मराठा आंदोलनाची कुणी वाट लावली ?

मयूरेश्वरा, तुझा महिमा कसा ?

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

नायर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील चार जणांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी शनय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाला डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर २० वर्षीय अनोळखी तरुणावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या अपघाताबाबत पुढील तपास सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version