घरक्राईमनामापंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतप्त भावना

- Advertisement -

एका ५५ वर्षीय महिलेचे कपडे बळजबरीने काढून तिची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना ३१ मार्च रोजी तरणतारण गावात घडल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलिस आणखी दोघांचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतप्त भावना उमटली असून अशा प्रकारे महिलेला अवमानास्पद वागणूक देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या महिलेचा मुलगा शेजारच्या मुलीसोबत पळून गेल्याने सूड म्हणून तिला अशा प्रकारे हीन वागणूक देण्यात आली.

पंजाब राज्याच्या महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पीडितेच्या मुलाची सासू, मेव्हणा आणि अन्य नातेवाइकांना अटक केल्याचे तर्न तरनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अश्वनी कपूर यांनी सांगितले. पीडितेची ओळख उघड होऊ नये, म्हणून या आरोपींची नावे सांगण्यात आलेली नाहीत. तसेच, अन्य दोघा आरोपींचा शोध सुरू आहे, असे कपूर यांनी सांगतिले.

हे ही वाचा:

केरळ: निधीची मागणी करत ‘बादल्या’ घेऊन रस्त्यावर उतरली ‘काँग्रेस’!

कंगना रनौटमुळे सुरू झाली चर्चा; बरकतुल्लाह, सुभाषचंद्र बोस की नेहरू?

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्टॅलिन यांनी दिली दोन मिनिटांची मुलाखत!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!

पीडितेच्या मुलाने महिनाभरापूर्वी त्याच्या शेजारच्या मुलीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर या मुलीची आई, भाऊ आणि आणखी काही भाऊ ३१ मार्चला या तरुणाच्या घरी पोहोचले. तेथे त्याने त्याच्या आईशी वाद घातला. तेव्हा त्याची आई घरात एकटीच होती. वाद वाढू लागल्यानंतर त्यांनी त्याच्या आईचे कपडे फाडले आणि तिला तसेच रस्त्यावर चालायला लावले. ते पाच जण या महिलेचे कपडे फाडत होते आणि तिची धिंड काढत होते, तेव्हा तिने स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही. तिच्या मुलाने तरुणीशी पळून जाऊन लग्न केल्याशी आपला काहीही संबंध नाही, असेही तिने निक्षून सांगितले. मात्र तिच्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही फरक पडला नाही. या प्रकरणी आरोपींवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version