घरक्राईमनामायुवक बुडाला; एका महिन्यात विहार तलावाने घेतले तिघांचे बळी

युवक बुडाला; एका महिन्यात विहार तलावाने घेतले तिघांचे बळी

आरे कॉलनी आणि पवईच्या मधोमध असलेला विहार तलाव हा मृत्यूचा तलाव बनत चालला आहे. एका महिन्यात या तलावाने तीन जणांचे बळी घेतले असून एवढे घडूनही येथील सुरक्षा यंत्रणेला जाग येत नाही. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

गौतम पांचाळ (१५) असे सोमवारी दुपारी बुडून मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरे कॉलनीमध्ये राहणारा गौतम पांचाळ हा सोमवारी दुपारी मित्रांसोबत विहार तलाव या ठिकाणी पोहायला आला होता, दरम्यान दगडावर पाय घरून गौतम हा पाण्यात पडला. मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

हे ही वाचा:

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

राज्य सरकारचे वेळकाढू धोरण ओबीसी समाजासाठी घातक ठरते आहे

‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला’

१९ कोटींच्या घबाडप्रकरणी पूजा सिंघल ईडीच्या अटकेत

 

१ मे रोजी देखील विहार तलावात बुडून एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यु झाला होता. हे दोघेही आरे कॉलनी येथे राहणारे होते. या दोन्ही घटनाप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या दोन्ही घटनांनंतर देखील येथील सुरक्षा यंत्रणांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे स्थानिकांकडून आरोप करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version