घरधर्म संस्कृतीमालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये नमाजसाठी स्वतंत्र जागा

मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये नमाजसाठी स्वतंत्र जागा

व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकल हिंदू समाज मुंबईने सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. मॉलमध्ये नमाजसाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये दोन लहान मुस्लीम मुली मॉलमधील नमाज अदा करण्याच्या जागेची माहिती देताना दिसतात. ‘मशीद लांब असल्याने अनेक जण नमाज अदा करू शकत नाहीत. मात्र, या मॉलमध्येच एक सुंदर मशीद आहे. आम्ही नमाज अदा करण्याचे कधीही चुकवत नाही. येथे नमाजसाठी सर्व आवश्यक सोयी उपलब्ध आहेत. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे त्या सांगताना दिसतात. व्हिडीओमध्ये या जागेची दृश्येही दाखवण्यात आली असून, तेथे करण्यात आलेल्या सुविधांची माहिती मिळते.

हे ही वाचा:

नेतान्याहूंच्या आघाडीला बहुमतापासून ८ जागा कमी

१२ वर्षांत ४९.६ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालून बाहेर

प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले

भूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

या प्रकारावरून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मॉलमध्ये नमाजसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था असेल, तर हिंदूंना पूजा किंवा प्रार्थना करण्यासाठीही अशीच सुविधा उपलब्ध आहे का, असा सवाल केला जात आहे. तसेच, मुंबईची वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version