घरधर्म संस्कृतीसनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात

सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे नवीन गाणे सध्या चर्चेत असून या गाण्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सनी लिओनी हिच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ नवीन गाण्याला अनेक लोकांनी विरोध दर्शवला आहे. राधा ही पूजनीय असून त्या गाण्यावर अश्लील नाच केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांकडून या गाण्याला विरोध होत आहे.

उत्तर प्रदेशमधील मथुरेत राधा पूजनीय असून या गाण्यावर सनीने अश्लील डान्स केला आहे. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालायला हवी, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने अभिनेत्रीवर कारवाई केली नाही आणि तिच्या व्हिडिओ अल्बमवर बंदी घातली नाही तर न्यायालयात जाऊ, असे लोकांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख?

… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे २२ डिसेंबरला रिलीज झाले. त्यानंतर काही कालावधीतच लोकांनी तिला यावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. या गाण्यात सनी ज्या पद्धतीने नाचत आहे आणि ते आक्षेपार्ह असल्याचे लोकांनी म्हटले आहे. राधा आमच्यासाठी पूजनीय असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही म्हटले आहे.

‘मधुबन में राधिका नाचे’ याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केले आहे. हे गाणे आता चांगलेच वादात सापडले आहे. हे गाणे मोहम्मद रफीच्या १९६० मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावर आधारित आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version